तलाठी पदासाठीची पात्रता | लवकरच अर्ज सुरु होतील | Talathi Bharti Qualification / Eligibility

 

तलाठी होण्यासाठी पात्रताशैक्षणिक पात्रता इतर सर्व माहिती:

तलाठी होण्यासाठी पात्रता / तलाठी भरती पात्रता – शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,आवश्यक कागदपत्रे आणि सर्व माहिती :

तलाठी हे प्रत्येक गावातील अत्यंत महत्वाचे पद आहे.आपल्यातील अनेक जण या पदासाठी परीक्षा द्यायला इच्छुक असतात तसेच त्यांना तलाठी होण्यासाठीची पात्रता काय आहे याची माहिती हवी असते.तर अशा सर्वांसाठी आम्ही या लेखामध्ये तलाठी होण्यासाठी पात्रता काय आहे याची माहिती देणार आहोत.

तलाठी होण्यासाठी पात्रता / तलाठी भरती पात्रता:

चला तर मग जाणून घेऊयात तलाठी होण्यासाठी ची शैक्षणिक योग्यता,तलाठी होण्यासाठी ची वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती आहेत.

 शैक्षणिक पात्रता :

तलाठी होण्यासाठी शैक्षणिक म्हणाल तर तुम्ही फक्त पदवीधर असावात. तुम्ही कोणत्याही शाखेची म्हणजे आर्ट्स,कॉमर्स,सायन्स किंवा इतर कोणतीही पदवी घेतलेली असावी. त्याच बरोबर MKCL मार्फत घेण्यात येणारा MS-CIT चा कोर्स तुम्ही उतीर्ण असावात व त्याचे प्रमाणपत्र तुमच्या कडे असावे. या दोनच शैक्षणिक पात्रता तलाठी होण्यासाठी आहेत.ज्या तुम्ही अगदी सहज पणे पूर्ण करू शकता आणि तलाठी होऊ शकता.

 वयोमर्यादा :

तलाठी होण्यासाठी ची वयोमार्यादा विविध कॅटेगरी नुसार वेगवेगळी आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरी मध्ये बसता त्यानुसार काय वयोमार्यादा आहे ते जाणून घ्या.

१) मागासवर्गीय – ४३ वर्षे

२) अमागास (ओपन प्रवर्ग ) – ३८ वर्षे

३) दिव्यांग – ४५ वर्षे

4) खेळाडू – ४३ वर्षे

५) प्रकल्पग्रस्त / भूकंप ग्रस्त – ४५ वर्षे

६) माजी सैनिक – ४६ वर्षे

७) अंशकालीन कर्मचारी – ४६ वर्षे

 कागदपत्रे :

तलाठी होण्यासाठी तुमच्या कडे विशेष अशी काही कागदपत्रे लागत नाहीत,तुम्ही आज पर्यन्त घेतलेल्या शिक्षणाच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रे आवश्यक आहेत. चला तर मग विस्तृत स्वरुपात जाणून घेऊयात तलाठी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोण कोणती आहेत.

१) तुमचा १० वी चा रिजल्ट व सर्टिफिकेट म्हणजेच SSC (एसएससी) ची गुणपत्रिका व प्रमाणपत्र.

२) तुमचा १२ वी चा रिजल्ट व सर्टिफिकेट म्हणजेच HSC (एचएससी) ची गुणपत्रिका व प्रमाणपत्र.

३) तुम्ही घेतलेल्या पदवीची म्हणजेच डिग्री ची गुणपत्रिका व प्रमाणपत्र.

४) एमएससीआयटी (MS-CIT) उतीर्ण झालेले प्रमाणपत्र.

५) जात प्रमाणपत्र.

६) राखीव प्रवर्गानुसार प्रमाणपत्र.

तलाठी होण्यासाठी वयोमर्यादा,शैक्षणिक पात्रता व आवश्यक कागदपत्रे या बाबत ची माहिती तुम्हाला या लेखामध्ये वरती दिलेलीच आहे. चला तर मग वाट कसली बघताय तलाठी होण्याच्या तयारीला लागा. तुम्हाला त्यासाठी आमच्या कडून खूप सार्‍या शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या